ठाण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
ठाणे. ता 21 जून (संतोष पडवळ) : ठाणे शहराचे आमदार श्री संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्थेच्या मार्फत ढोकाळी येथील शरद चंद्रजी पवार मिनी स्टेडियम मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या योग दिनासाठी उस्फूर्तपणे नागरिकांचा प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमांमध्ये पतंजली योग समिती यांचे मोलाचे सहकार्य लाभले.जे स्वच्छता दुत शहरातील साफसफाई करून नागरिकांच्यां आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपले काम योग्यरीतीने करतात त्यांनीसुद्धा या शिबिरामध्ये मोठा सहभाग घेतला. या शिबिरामध्ये भाजपाचे पदाधिकारी , हेमंत म्हात्रे , अल्केश कदम मत्स्यगंधा पवार तृप्ती सुर्वे महेश ताजणे डॉक्टर सौ ताजने राधा शर्मा जितेंद्र मडवी स्नेहा पाटील चंद्रमा चव्हाण रविराज रेड्डी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आयोजक दत्ता घाडगे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.