दिवा भाजप व जागा हो दिवेकर च्या संयुक्त विद्यमाने 10/12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न
ठाणे, दिवा (संतोष पडवळ) : दिवा भाजप आणि आता तरी जागा हो दिवेकर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या १० वी /१२वी च्या विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.आणि एक नव्या जिद्दीने ते इथून पुढच्या त्यांच्या वाटचालीस सुरुवात करतील यात शंकाच नाही. तसेच जी मार्गदर्शक मंडळी होती त्यांनी पण अगदी कोणतेही जड शब्द न वापरता मुलांना सहज सोप्या भाषेत समजेल अशा पद्धतीने एक त्यांना चांगली दिशा दाखवली. जो एक गोड गैरसमज होता की जास्त टक्के पडले म्हणजे मी सायनस अथवा इंजिनिअरिंगच करायला हवं आणि कमी टक्के पडणारी मुलं फक्त आर्ट्स ला जातात तो छान प्रकारे या शिबिरात दूर करण्यात आला. असे विविध संभ्रम यात दूर करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अगदी कमी कालावधीत विजय भोईर, गणेश भगत, सचिन भोईर, ज्योती पाटील, सीमा भगत, समीर चव्हाण, मधुकर पाटील, युवराज यादव, कल्पेश सारस्वत, शमशेर यादव, अवधराज राजभर यांनी अथक परिश्रम घेतले. आज दिव्यात बरेच राजकीय मंडळी मतदान समोर ठेवून फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी कार्यक्रम ठेवतात. पण विजय भोईर यांनी कायमच सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आणि एक चांगल्या प्रकारे येणाऱ्या युवा पिढीचे प्रबोधनात्मक कार्य त्यांनी परत एकदा कालच्या कार्यक्रमातुन करून दाखवलं. यावेळी त्यांनी या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आलेल्या तज्ञ मार्गदर्शक, सर्व कार्यकर्ते, आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.