मुबंईतील भांडुप मधील शिवसेना शाखाप्रमुख किरण सुर्वे यांना पितृशोक
मुंबई, ता 29 जून (किशोर गावडे) : मुंबईतील भांडुप प्रभाग क्रमांक 112 चे शिवसेना शाखाप्रमुख किरण सुर्वे यांचे वडील कृष्णा दत्तात्रय सुर्वे वय ( 80 )यांचे वृद्धापकाळाने आज 29 जून रोजी सकाळी 9.30 दरम्यान निधन झाले.
मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. डॉक्टरी सल्ल्याने प्रकृतीनुरूप औषधे सुरू होती. आज अचानक प्रकृती खालावली गेल्याने सकाळी अखेरचा श्वास घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यातील,दापोली,मुरुड हे गाव, गावाच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर जबाबदारी सांभाळून त्यांनी समाजाला प्रबोधन केले.सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेलं काम हे निश्चितच भूषणावह होते. त्यांच्या निधनामुळे लढवय्या जेष्ठ नागरिकांचा आधार गेल्याचे मुरुडच्या ग्रामस्थांनी सांगितले.
टॅक रोड येथील गिरीश टेक्सटाइल मधून ते सेवानिवृत्त झाले होते. कामगार व मालक यांच्याविषयी जिव्हाळ्याचे संबंध होते.व तितका आदर होता. सन 2014 साली किरण सुर्वे यांच्या मातोश्रीच्या निधनानंतर ते खचले गेले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी ,स्नूषा,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी रहात्या घरी,भांडुप पश्चिम येथील पाटकर कंपाऊंड, सद्गुरू मित्र मंडळ, शिवसेना शाखा मागे ठेवण्यात आले आहे. सायंकाळी 7.30 नंतर भांडुप हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. असे सुर्वे कुटुंबीयांकडून समजते.