ठाण्यातील ढोकाळी येथील क्रीडा संकुलाला अखेर मराठी फलक ; मराठी एकीकरण समितीच्या मागणीला यश
ठाणे, ता 29 जून (संतोष पडवळ) ठाण्यातील ढोकळी भागातील शरदचंद्र क्रीडा संकुल मोठ्या थाटात उभे राहिले होते परंतु सदर क्रीडा संकुलाचा फलक हा संपूर्ण इंग्रजीत होता प्रसंगी सदर बाब लक्ष्यात आल्यावर श्री अतुल पिंगळे
ठाणे शहर उपाध्यक्ष मराठी एकीकरण समिती,(महाराष्ट्र राज्य)यांनी पाठपुरावा करून सदर क्रीडा संकुलावर अखेर मराठी फलक लागला.मराठी एकीकरण समितीच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे.