दिव्यात एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन व सर्व मा.नगरसेवकासह ८०० पद्धधिकारी राजीनामा देण्याची तयारी.

0

ठाणे,दिवा. ता 30 जून (संतोष पडवळ) – श्री एकनाथ शिंदे समर्थकांची हकालपट्टी करण्याची मालिका सुरू असताना अशा कारवाईंना आम्ही घाबरत नाही असे म्हणत दिव्यातील सुमारे ८०० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. यामध्ये दिव्यातील सर्व आठही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. आपली भूमिका मांडण्यासाठी या सर्व समर्थकांनी दिव्यात शक्तिप्रदर्शनही केले.ठाणे
महापालिका क्षेत्रात असूनही दिवा शहर नेहमीच विकासकामांसाठी उपेक्षित राहिले होते. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून येथे अनेक विकास कामे होत आहेत. म्हणूनच गेल्या पालिका निवडणुकीत येथून शिवसेनेचे आठ नगरसेवक निवडून आले. मात्र यावेळी प्रभाग रचनेत एक नगरसेवक वाढण्याची अपेक्षा असतानाही राष्ट्रवादीच्या दबावामुळे ही संख्या कमी करण्यात आली. यावर शिंदे यांनी आक्षेप घेत या मतदारसंघात नगरसेवकाची संख्या एकने वाढवून घेतली. त्यामुळे आम्ही दिव्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचे माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!