मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र वाबळे यांची हॅटट्रीक
मुंबई, ता 1 जुलै (संतोष पडवळ) : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. नरेंद्र वि. वाबळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले.
श्री. वाबळे हे अध्यक्षपदी एकूण चौथ्यांदा निवडून आले आहेत. पत्रकार संघाच्या विश्वस्तपदी श्रीमती राही भिडे आणि श्री. देवदास मटाले निवडून आले आहेत.
पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी श्री. शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर तर कार्यवाहपदी श्री. संदीप चव्हाण हे निवडून आले आहेत. कोषाध्यक्षपदी श्री. जगदीश भोवड यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे.
कार्यकारिणीच्या नऊ जागांवर पुढील उमेदवार विजयी झाले आहेत.
1) राजेंद्र हुंजे, 2) किरीट गोरे, 3) आत्माराम नाटेकर, 4) गजानन सावंत, 5) दिवाकर शेजवळकर, 6) राजेश खाडे, 7) देवेंद्र भोगले, 8) उमा कदम, 9) राजीव कुलकर्णी.
निर्वाचन अधिकारी श्री.श्रीकांत नाईक यांनी संघाच्या 81 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे निकाल जाहीर केले. सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून श्री. विजय तारी यांनी काम पाहिले. त्यांना श्री. दशरथ राणे यांनी व पत्रकार संघाच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहाय्य केले.