भारतीय मराठा संघ आयोजित दिव्यात विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन मेळावा उत्साहात
ठाणे, दिवा, ता 4 जुलै (संतोष पडवळ) दिव्यात भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार व सरचिटणीस राजेंद्र पालांडे यांच्या मार्गदर्शनानुसार व प्रदेश सचिव एस डी पाटील(आर्किटेक्ट), उपाध्यक्ष दीपक पालांडे,ठाणे महानगर संपर्कप्रमुख अरुण फणसे यांच्या निदर्शनाखाली व दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर, महिला अध्यक्षा निकिता सालप यांच्या माध्यमातुन दिवा,ठाणे येथे सन 2022 मध्ये दहावी व बारावी बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणतज्ञ सत्यवान रेडकर सर यांची उपस्थिती लाभली.मार्गदर्शन करताना आगामी काळात महाराष्ट्रातील विद्यार्थी शासकीय,निमशासकीय व प्रशासकीय सेवेमध्ये कशा तऱ्हेने पुढे येऊन त्यांचे उज्वल भविष्य घडवता येईल यावर मार्गदर्शन करण्यात आले.तसेच या करता विद्यार्थ्यांसाठी कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये वाटा खुल्या आहेत यावर तंतोतंत माहिती देण्यात आली. यापुढे कोणत्याही विद्यार्थ्यास कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन आवश्यक असल्यास ते सदैव तत्पर असतील असे त्यांनी सूचित केले. यामुळे पालक वर्गास सुद्धा समाधानकारक वाटले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आदेश भगत समाज सेवक,विजय भोइर ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य भाजप,तुषार पाटील विभाग अध्यक्ष-मनसे यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी भारतीय मराठा संघाचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अनघा जाधव संपदा ब्रिद,प्रदेश सचिव महेश महापदी,खजिनदार अजित जाधव,ठाणे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील सर,ठाणे जिल्हा सचिव अनिल काकुळते,आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाची धुरा दिवा शहर अध्यक्ष निकेश खानविलकर, उपाध्यक्ष सुधीर घाणेकर, महिला अध्यक्षा निकिता सालप, सचिव/खजिनदार रामकृष्ण सावंत, उपसचिव गणेश जाधव,संघटक समीर सावंत,हितेश मोरे,सुनील शिंदे, गौरी बेर्डे,अरुणा मस्कर,माया रणावरे,संतोष पाटील, आकाश हरले,सुशांत यादव,रंगराव पाटील,अभिजीत जाधव,सोशल मीडियाप्रमुख अश्विन वारंग आदींनि सांभाळली.यावेळी ताराराणी फौंडेशन, जाणता राजा मित्र मंडळ, सम्यक समता मंडळ,सार्वजनिक संयुक्त जयंती उत्सव मंडळ ,टीम युथ फाउंडेशन फाउंडेशन,श्री स्वामी समर्थ मित्र मंडळ, दिवा शहर पत्रकार संघ, अखील ट्युटोरियल्स यांची विशेष उपस्थिती लाभली.