डोंबिवलीत स्वराज्य संघटनेकडून वृक्षारोपण उत्साहात पार
डोंबिवली, ता 8 जुलै (दीपक जाधव) : – स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेच्या माध्यमातून गुरूवार ७ जुलै २०२२ रोजी दुपारी डोंबिवली पश्चिमेच्या बावन्न चाळ येथील मैदानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
संपूर्ण देश पातळीवर सामाजिक तथा पोलिस, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे तथा सचिव कमलेश शेवाळे देवा यांच्या मार्गदर्शना खाली ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष विनय डांगे. स्वराज्यचे समन्वयक पत्रकार प्रा. दिपक जाधव. डोंबिवली शहरअध्यक्षा सेजल पालव. दिवाशहर संपर्क प्रमुख राहुल शिंदे. डोंबिवली शहर चिटणीस सिद्धिता महाकाळ. अक्षरा ङोळस. सेजल गोवलकर. सुजल पालव यांच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आले.
या प्रसंगी सध्या वृक्षरोपणाची नितांत गरज आहेच. पण लावलेले वृक्ष व्यवस्थित जोपासता यायला हवेत. प्रत्येक माणसाने किमान एक तरी झाड लावून जगवावे आणि तरूणांनी विधायक कार्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. नावासाठी अजिबात काम करू नये. काम केल्यावर आपोआप तुमचे नाआव पुढे येईल तुमची दखल घेतली जाईल असे प्रतिपादन प्रा. दिपक जाधव यांनी केले. विनय डांगे यांनी ही तर सुरूवात आहे आपण अशा स्वरूपाची अनेक विधायक व समाजाच्या सर्वच स्तरांना मार्गदर्शक ठरणारी आणि उपयोगी पडणारी कामे करणार असल्याची माहिती दिली. सेजल पालव यांनीही उपस्थितांना झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देतांना महिलांनी विधायक कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. तर राहुल शिंदे यांनी समाजोपयोगी कामे करायला आपल्याला आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
परिसरातून धो धो पावसातही स्वराज्यचे कार्यकर्ते वृक्षारोपणा सारखी महत्वाची कामे करीत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे..