नवी मुंबईतील कोपरखैरणे पोलीसांनी तीन पिस्तुलासह केली आरोपीस अटक

0

नवीमुंबई,कोपरखैरने ता 14 जुलै (प्रतिनिधी) : दिनांक ०८/०७/२०२२ रोजी पोउपनि धुमाळ यांना त्यांच्या बातमीदाराने विश्वसनिय बातमी दिली की, एक इसम तीन टाकी चौक, माथाडी हॉस्पीटल, कोपरखैरणे सेक्टर ६ नवी मुंबई येथे पिस्तुलासह येणार आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रदीप तिदार यांनी लागलीच दोन वेगवेगळे पथके तयार करून त्याअनुषंगाने सापळा रचुन कोपरखैरणे एनएमटी बस डेपोच्या समोरील माथाडी हॉस्पीटलच्या बाजुस असलेल्या गल्लीतुन येणाऱ्या इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन डाव्या बाजुस कमरेजवळ खोवलेले एक रिव्हॉल्वर हस्तगत केले.

आरोपीचे नाव व पत्ता- ऋषिकेश रणजित जायभाये उर्फ बाबु उर्फ बाब्या, वय २५ वर्षे, धंदा – बेकार, राहणार रूम.नं. ५९१, एसएस २, सेक्टर ८,गणेश मंदीर शेजारी कोपरखैरणे, नवी मुंबई आरोपीकडे विश्वासात घेवुन अधिक कौशल्यपुर्ण तपास करून त्याचेकडुन आणखी दोन पिस्तुल – व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.

हस्तगत मालमत्ता खालीलप्रमाणे

१) एक देशी बनावटीचे रिव्हॉल्वर (सिक्सर)

२) दोन देशी बनावटीचे पिस्तुल

३) सुझुकी ॲक्सेस मोटार सायकल

सदर आरोपीविरूध्द कोपरखैरणे पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्र. ३१६/२०२२ कलम ३, २५ शस्त्र अधिनियम १९५९, सह कलम ३७(१), १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरूध्द कोपरखैरणे पोलीस ठाणे येथे यापुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. आरोपीत यास दिनांक १५/०७/२०२२ रोजी पर्यंत पोलीस कोठडी असुन पुढील तपास चालु आहे.

सदर गुन्हयाचा तपास श्री. बिपीनकुमार सिंह, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, श्री. जय जाधव, सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई, श्री. विवेक पानसरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, वाशी, श्री. डी. डी.टेळे, सहा. पोलीस आयुक्त, वाशी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रदीप तिदार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोपरखैरणे पोलीस ठाणे, श्री. गजानन कदम, पोलीस निरीक्षक, प्रशासन, व गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री. सागर धुमाळ, पोना/१८०२ राकेश पाटील, पोना/१७३७ योगेश डोंगरे, पोशि/१२१३४ गणेश गिते, पोशि/१२३४३ निलेश निकम, पोशि/१२३४२ अनिल बिहाडे, पोशि/ ३२३४ सचिन दळवी, पोशि/३७६० दोंदे, पोशि/२७३० हमरे यांनी अविरत मेहनत घेवुन आरोपीकडुन तीन पिस्तुल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!