जान्हवी राणे यांची मुंबई महानगर पालिका ( मुंबई शहर) महिला बचत गटांच्या अध्यक्षपदी निवड

0

मुंबई, ता 14 जुलै (किशोर गावडे) : भाजपा वॉर्ड क्र.213 च्या अध्यक्षा व लोकप्रिय समाजसेविका सौ.जान्हवी जगदीश राणे यांची मुंबई महानगर पालिका (शहर) महिला बचत गटांच्या प्रथमच पार पडलेल्या निवडणूकीत अध्यक्षपदी भरघोस मतांनी निवडून आल्या.
निवडून आल्यानंतर बचत गटांतील महिलांनी व भाजपा 213 च्या अनेक भाजपा पदाधिकारी यांनी सौ. जान्हवी राणे यांची सदिच्छा भेट घेऊन अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी असंख्य स्थानिक महिलां व बचत गटांतील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

सौ. जान्हवी राणे यांनी आपल्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या,
बचतगटाची कल्पना, नियम, अटी, कामकाज व्यवस्थितपणे समजावून सांगून ,एखादया नवीन संकल्पनेची सुरुवात करणे अवघड नाही, पण ती संकल्पना सतत चालू ठेवणे आणि पूर्ण करणे ही मात्र अवघड गोष्ट आहे. तसेच एखादी नवीन संकल्पना राबवताना ते ध्येय गाठण्यासाठी धीर धरावा लागतो. वेळ खर्च करावा लागतो. प्रयत्न नेटाने करावे लागतात, तेव्हाच ध्येय साध्य होऊ शकते.
बचतगटाच्या स्थापनेमध्ये बचत गटाचे पैसे गुंतविलेले असतात, गटातील लोकांची धडपड व प्रयत्न यांचाही बराच मोठा वाटा असतो म्हणून अगदी सुरुवातीपासून ते कार्य त्या लोकांचेच असणे आवश्यक आहे. असे सांगून राणे म्हणाल्या की ,
प्रेरणा हीच बचतगटाची गुरुकिल्ली आहे व सुरुवातीला तर तिचे फारच महत्त्व आहे. काही महिला बचतगट स्थापन करण्यास अगदी सहज प्रेरित होतात. हा उद्देश सफल करावयाचा असेल तर लोकांचा सहभाग व चर्चा आणि शंका निरसन करणे हे फार गरजेचे असून बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी जास्तीत जास्त बचत गट स्थापन करणे हे गरजेच आहे. असेही सौ. जान्हवी राणे यांनी आपल्या भाषणात सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!