घाटकोपरच्या गुरुकुल महाविद्यालयात 55 व्या युवा महोत्सवाची एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात.
मुंबई, ता 18 जुलै (संतोष पडवळ) : मुबई विद्यापीठाचा विद्यार्थी विकास विभाग आणि मुंबई प्रदेश आर्य विद्या सभा संचालित गुरुकुल कॉलेज ऑफ कॉमर्स घाटकोपर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 15जुलै 2022 रोजी 55th व्या युवा महोत्सवाची झोन 1 आणि 2 साठीची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक श्री निलेश सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच इतर जिल्हा समन्वयक याची देखील उपस्थिती होती. मुंबई विद्यापीठाच्या बहु चर्चित आणि प्रतिष्ठित अशा युवा महोत्सवाच्या अटी व नियम यांची झोन 1आणि 2 येथील महाविद्यालयांना सविस्तर माहिती व चर्चा करण्यासाठी हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेस एकूण 52 महाविद्यालयाचा 87 विद्यार्थी आणि 46 शिक्षक यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये कोलाबा ते वडाळा आणि सायन ते मुलुंड, नवी मुंबई येथील महाविद्यालय सहभागी झाली होती. Literary आणि fine art तसेच performing art याविषयावर तज्ञांनी आपली मते मांडली होती. एकूण 5 सत्रामध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमास गुरुकुल महाविद्यालयाचे सेक्रेटरी श्रीयुत जयेश वोरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्या डॉक्टर नंदिता रॉय आणि गुरुकुल महाविद्यालय student council प्रमुख डॉक्टर प्रीती घाग व इतर सदस्य व IQAC committee यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम पार पाडण्यास मदत केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2 वर्षांनी ऑफलाईन कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे in-charge director डॉक्टर सुनील पाटील यांनी गुरुकुल महाविद्यालयाचे अभिनंदन केले. सर्व सहभागी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी कार्यशाळेच्या पद्धतशीर आयोजनाबद्दल गुरुकुल महाविद्यालयाचे आभार मानले. मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव म्हणजे विद्यापीठातील विद्यार्थींना त्यांचे कलागुण सादर करण्याची जणू पर्वणीच असते. यंदा कोरोनानंतर युवा महोत्सवाच्या निमित्ताने कलागुण सादर करण्यासाठी विद्यार्थी वर्गात अतिशय उत्साहाचे वातावरण आहे. युवा महोत्सवाच्या घवघवीत यशासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धांमध्ये भरघोस सहभाग आवश्यक आहे अशा शब्दात श्री निलेश सावे यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले.