पावसाळयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलशुद्धीकरण करण्याचे ठाणे मनपा अतिरिक्त आयुक्तांनी दिले निर्देश
टेमघर जलशुद्धीकरण केंद्राची केली पाहणी
ठाणे (२१ जुलै, संतोष पडवळ ) ठाणे शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या स्वतःच्या टेमघर जलशुद्धीकरण केंद्राची अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी पाहणी केली. यावेळी पावसाळयात जलशुद्धीकरण केंद्रावर सुरु असलेल्या प्रचलित जलशुद्धीकरण प्रक्रियेऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलशुद्धीकरण करण्याचे दिले निर्देश त्यांनी पाणी पुरवठा विभागास दिले.
या पाहणी दौऱ्यास नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी, मुख्य लेखापरीक्षक श्री.पतंगे, कार्यकारी अभियंता विनोद पवार, विकास ढोले, तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी यांनी टेमघर जलशुद्धीकरण केंद्रात होणाऱ्या जलशुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली. पावसाळयात नागरिकांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने प्रचलित जलशुद्धीकरण प्रक्रियेऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जलशुद्धीकरण करण्याचे दिले निर्देश त्यांनी पाणी पुरवठा विभागास दिले.
टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातून २०० दशलक्ष घन मीटर शुद्ध पाणी पुरवठा होत आहे. या केंद्राची इमारत व यंत्रणा जुनी झाली आहे. त्याबद्दल श्री. माळवी यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच दुरुस्ती, मजबुतीकरण व रंगरंगोटीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश संबधितांना दिले. तसेच याठिकाणी आवश्यक कर्मचारी ,तंत्रज्ञ यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देतानाच सुरक्षितेच्यादृष्टीने या ठिकाणी संरक्षण भिंत व रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचनाही त्यांनी संबधितांना दिल्या.
..