उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिवा मंडळा तर्फे बुस्टर डोस व दाखले वाटप.

ठाणे, दिवा, ता 22 जुलै (संतोष पडवळ) : दिव्यात आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार संजय केळकर ह्यांचे मार्गदर्शनाखाली दिवा विभागात अवधूत हॉल येथे बूस्टर डोस व मोफत दाखले वाटप चा कार्यक्रम दिवा मंडळातर्फे करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे ठाणे शहर जिल्हा संघटक सरचिटणीस विलास साठे उपस्थित होते यावेळी प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वय वर्षं १८ते 65 वर्षांपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन अवधूत हॉल ग्लोबल स्कूल समोर आगासन दिवा रोड येथे करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला हे शिबीर सोशल डिस्टनसिंग व शासकीय नियमांचे पालन करुन करण्यात आले यावेळी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे ठाणे शहर कार्यकारी सदस्य गणेश भगत मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण युवराज जाधव युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत महिला अध्यक्ष ज्योती पाटील डॉक्टर सेल आघाडी विद्यासागर दुबे अंकुश मढवी नागेश पवार राहुल साहू आशिष पाटील सुमित मढवी शैलेश भोईर सुदेश पाटील मधुकर पाटील गौरीशंकर पटवा आनंदा पाटील अवधराज राजभर विजय वाघ अशोक गुप्ता आधी कार्यकर्ते उपस्थित होते