ठाणे पोलीस आणि रेडिओ सिटी यांच्याकडून विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना विनामूल्य हेल्मेट वाटप
ठाणे, ता 23 जुलै (संतोष पडवळ) : – दुचाकी प्रवाशांनी स्वतःच्या संरक्षणासाठी हेल्मेट घालावे याकरिता ठाणे पोलीस आणि रेडिओ सिटी एफएम वाहिनी `पिछेवाले बाबू हेल्मेट लगा लो’ ही जनजागृती मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत शुक्रवार, २२ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता तीन हात नाका रहदारी वाहतूक शाखा, ठाणे येथे ठाणे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, रेडीओ सिटीचे आरजे करण, डीआयडी फेम कुंवर अमर यांच्या हस्ते विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकी स्वारांना विनामूल्य हेल्मेट वाटप करण्यात आले.
यावेळी ठाणे सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे व रेडीओ सिटीचे आरजे करण यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट घालून प्रवास करण्याचे आवाहन केले. ठाणे पोलिसांनी केलेल्या सहकार्याबद्दल रेडिओ सिटीने आभार व्यक्त केले. यावेळी अपर पोलीस आयुक्त संजय जाधव पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, डॉ. विनयकुमार राठोड, दत्ता कांबळे,वाहतूक पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी,संदीप सावंत, चेतना चौधरी, कविता गावीत व इतर पोलीस अधिकारी व वाहतूक कर्मचारी तसेच रेडिओ सिटीचे रेडिओ जॉकी उपस्थित होते.