पिंपरी पेंढार येथे अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या शाळेच्या किलबिल विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा उत्साहात
आळेफाटा, ता 23 जुलै (संतोष पडवळ) : अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या पिंपरी पेंढार येथील शाळेच्या किलबिल विद्यार्थ्यांची उद्याच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रसंगी शालेय विध्यार्थी व शिक्षकवृंद भक्तिमय वातावरणात मोठया उत्साहात न्हाऊन गेले होते. सदर सोहळ्यात विध्यार्थी/ विद्यार्थिनी विठ्ठल रुख्मिणी व वारकरी यांचा पेहराव करून टाळ व तुळशी वृंदावन घेऊन गावात प्रभातफेरी मारण्यात आली.सदर उपक्रम जिल्हा परिषदेच्या पिंपरी पेंढार शाळेचे मुख्याध्यापक सौ उषा कुटे, उप मुख्याध्यापक श्री विजय कुऱ्हाडे यांच्या सह शिक्षकवृंद व पालकवर्ग व संतोष दुरगुडे यांचे मार्गदर्शन लाभले.