कळवा पुलाखालील कांदळवनात बांधलेल्या अनधिकृत ५७ झोपड्यांवर ठाणे महापालिकेची धडक कारवाई.
ठाणे ( ता 25 जुलै, संतोष पडवळ ): ठाणे महापालिका क्षेत्रातील कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे असून कांदळवनावर अतिक्रमण झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर आज कळवा पुलाखाली कांदळवनात बांधलेल्या अनाधिकृत ५७ झोपड्यांवर आज निष्कासानाची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई अतिरिक्त आयुक्त(२) संजय हेरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अजय एडके, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी अतिक्रमण विभाग व प्रदूषण विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने केली.