अखेर आजपासून दिवा शहराला आतिरिक्त ६.५० एमएलडी पाणी
ठाणे, दिवा. ता 26जुलै (संतोष पडवळ) : ठाणे मनपाच्या हद्दीतील दिवेकर पाणीटंचाईमुळे मेटाकुटीला आले असताना आज पासून आतिरिक्त ६.५० एमएलडी पाणी आज पासून मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व मा.खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिवा शहरासाठी मंजूर केलेल्या आतिरिक्त ६.५० एमएलडी पाणी आज पासून काटई येथून मुख्य जलवाहिणीतून मा.उप महापौर रमाकांत मढवी यांच्या हस्ते सोडण्यात आले व दिवेकरांना जास्त दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
प्रसंगी दिव्यातील ठाणे महापालिकेचे कर्मचारी व मा.नगरसेवक.शैलेश पाटील,मा.नगरसेवक.अमर पाटील,मा.नगरसेवक.दीपक जाधव,मा.नगरसेविका सौ.दर्शना चरनंदास म्हात्रे,मा.नगरसेविका.दीपाली उमेश भगत, मा.नगरसेविका अंकिता पाटील व शिवसेना पद्धधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते