समाजसेविका अश्विनी केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
बीड, ता 28 जुलै (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील आदर्श व्यक्तिमत्व स्वरगिय पहेलवान धनराज भाऊराव केंद्रे यांच्या सूनबाई अश्विनी ताई अमोल केंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त संत भगवान बाबा विद्यालय, तसेच जिल्हा परिषद शाळा डोंगर पिंपळा येथे शालेय उपयोगी साहित्य वाटप केले. सदर साहित्य वाटप समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांच्या सासूबाई सत्यवती धनराज केंद्रे तसेच दिनेश शेप, सरपंच व्यंकटी केंद्रे, उपसरपंच आनंद केंद्रे, जीवन बापू सरवदे, उत्तम तिडके ,बाळासाहेब केंद्रे ,सुधाकर केंद्रे ,शिवाजी काळे, राजकुमार केंद्रे, शालेय समिती अध्यक्ष रावण केंद्रे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. जील्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच संत भगवान बाबा विद्यालय येथील शिक्षकांनी आईसाहेब सत्यवती धनराज केंद्रे,समाजसेवक अमोल धनराज केंद्रे,समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे,ग्राम संवाद सरपंच संघ बीड जिल्हा अध्यक्ष दिनेश शेप यांचे आभार मानले.