दिव्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ,एका प्रभागातील मतदार निवडणार दुसऱ्या प्रभागाचे नगरसेवक !
दिव्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ,एका प्रभागातील मतदार निवडणार दुसऱ्या प्रभागाचे नगरसेवक!
भाजपची राज्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार
ठाणे, दिवा ( ता 1ऑगस्ट, संतोष पडवळ) :-ठाणे महापालिका हद्दीतील दिवा शहरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असून एका प्रभागाचे सुमारे 3 हजार मतदार हे दुसऱ्या प्रभागातील नगरसेवक निवडणार असल्याने ही लोकशाहीची चेष्टा आहे असे म्हणत या गैरव्यवहारची चौकशी करावी,दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी व याद्या दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेऊन केली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या अंतिम याद्या प्रसारित झाल्या असून दिवा विभागातील वार्ड क्रमांक 43, 44, 45 मधील याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेली आहे.या संदर्भात दिवा भाजपने पत्रव्यवहार केला असून याबाबत महापालिकेने अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही.अद्याप दोषी अधिकाऱ्यांवर कोणतेही कारवाई केलेली नाही. वार्ड क्रमांक 43 मधले तीन ते चार हजार मतदार हे वार्ड क्रमांक 45 मध्ये टाकण्यात आले आहेत.ही लोकशाहीची चेष्टा आहे. भाजपच्या वतीने या बाबतची तक्रार मुख्य निवडणूक आयुक्त,मुंबई उरविंद सिंग मदान यांच्याकडे देण्यात आली आहे.यावेळी भाजपचे भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड,दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे, वार्ड अध्यक्ष नागेश पवार आदी उपस्थित होते