“बेटी बचाओ बेटी पढाओ” या नरेंद्र मोदींच्या अभियानात कराटे प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची- आमदार संजय केळकर
ठाणे, ता 2 ऑगस्ट (संतोष पडवळ) : शोटोकान कराटे डू या संस्थेतर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन ठाण्यातील सिडको येथील कोळी समाज हॉल च्या आत हि कराटे स्पर्धा रंगली भाजपा चिटणीस दत्ता घाडगे यांच्या माध्यमातून ठाण्यातील कोळी समाज हॉल याठिकाणी राज्य स्तरीय कराटे स्पर्धो ठेवण्यात आल्या राज्यभरातून स्पर्धक यात सहभागी झाले.सुप्रसिद्ध कराटे प्रशिक्षक फिरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हि कराटे स्पर्धा पार पडली.
आमदार संजय केळकर यांनी सांगितले की बेटी बचाव बेटी पढाव या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी अभियानात कराटे प्रशिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे व प्रत्येक मुलीने स्वसंरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.
विजेत्या स्पर्धकांना मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, ठाणे,पुणे, नागपूर, औरंगाबाद,जालना अश्या विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला.
यावेळी प्रमुख उपस्थिती आमदार संजय केळकर होते.
ह्या कराटे स्पर्धा आयोजन करण्याच्या मागच मुख्य उद्देश म्हणजे लहान मुला मुलींना स्वतः चे रक्षण करता आले पाहिजे.(सेल्फ डिफेन्स). माननीय आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ठाणे शहरात 12 ते 15 ठिकाणी खास मुलीँसाठी कराटे शिबिर घेऊन सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग देण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपा पदाधिकारी सौ विद्या शिंदे नरेश पवार भाजपचे प्रवक्ता श्री अजित चव्हाण यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली. प्रत्येक शाळेत पाचवी ते दहावीच्या मुलींना कराटे प्रशिक्षण सक्तीचे केले गेले पाहिजे व प्रत्येक शाळेत कराटे प्रशिक्षक नेमण्याची सक्ती शासनाने केली पाहिजे जेणेकरून पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीं चे स्, बेटी बचाव बेटी पढाव हे स्वप्न पूर्ण होईल असे आयोजक भाजपा चिटणीस श्री दत्ता घाडगे यांनी सांगितले.