ब्रेकिंग ; मुंबईत १४०३ कोटी ४८ लाख रुपये किंमतीचे ७०४ किलो ‘ एम.डी. हे अंमली पदार्थ जप्त

0

मुंबई, दि. 4 (ब्युरो रिपोर्ट ) : एमडी या अंमली पदार्थाचा पुरवठा करून त्याचा व्यापार करणाऱ्या टोळीचा मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाने छडा लावला .या कारवाईत पथकाने एका महिलेसह पाच जणांच्या टोळीला अटक केली. या टोळी कडून १४०३ कोटी ४८ लाख रुपये किंमतीचे ७०४ किलो वजनाचा ‘ एम.डी. ‘ मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला .

सदर अमली पदार्थ विरोधी विशेष मोहीमेंतर्गत अंमली पदार्थ विरोधी कक्ष , वरळी युनिटचे पथक , अंमली पदार्थ खरेदी – विक्री करणारे , पुरवठा , साठा करणारे व्यक्तीचा गस्तीदरम्यान शोध घेत होते . यावेळी गोवंडीच्या शिवाजीनगर परीसरातुन २५० ग्रॅम ‘ एम.डी ‘ ( मेफेड्रॉन )सह एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले . त्याच्या कडे केलेल्या चौकशीत त्याला अन्य दुसऱ्या आरोपीने एमडीचा पुरवठा केल्याचे आढळून आल्यावर त्यालाही पथकाने अटक केली . त्याच्याकडुन २ किलो ७६० ग्रॅम वजनाचा ‘ एम.डी ‘ ( मेफेड्रॉन ) सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यानंतर एका महिलेला ताब्यात घेतले . गुन्ह्याचा तपास सुरू असताना नालासोपारा येथे एका कारखान्यात एमडी ची निर्मिती होत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. त्या आधारे पथकाने नालासोपारा (पश्चिम)येथील हनुमान रोड चक्रधर नगर सीताराम बिल्डिंग मध्ये छापा टाकला. या छप्यात
पथकाने १४०३ कोटी ४८ लाख रुपये किंमतीचे ७०१ किलो ७४० ग्रॅम वजनाचा ‘ एम.डी.(मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.अशा प्रकारे या पथकाने एका महिलेसह पाच जणांच्या टोळीला अटक केली.

सदर तपासात यातील एका आरोपीने रसायन शास्त्रामध्ये ऑरंगनिक केमिस्ट्रीचे शिक्षण घेतले असल्याचे आढळून आले आहे . त्याने वेगवेगळे केमीकल एकत्रित करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करून ‘ एम.डी. ‘ ( मेफेड्रॉन ) हा अंमली पदार्थ बनविण्याचे ज्ञान आत्मसात केले आहे . तसेच तो मागणीप्रमाणे गिन्हाईकांना ‘ एम.डी. ” ( मेफेड्रॉन ) हा अंमली पदार्थ विकत असतो अशी माहिती मिळाली . तसेच स्वत : ची ओळख लपविण्यासाठी तो वेगवेगळ्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मचा वापर करीत असल्याचे अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!