वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात खरेदीची आजादी
ठाणे, ता 5 ऑगस्ट (संतोष पडवळ) : मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळातर्फे ठाण्यात घंटाळी मंदिर मैदान येथे ,”महाराष्ट्र व्यापारी पेठ” अंतर्गत गृहपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय केळकर, वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रतिनिधी अजित पाटील, संतोष विचारे, हेमंत मोरे, जीवन भोसले, निलेश मोरे,समिर कोरे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या नागरिकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून भरपूर बक्षिसे दिली जाणार आहेत. दररोज तीन ते चार हजार ठाणेकर या प्रदर्शनाला भेट देतात असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले. नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व जीवनोपयोगी वस्तू मिळाव्यात आणि महिला उद्योजक व नवउद्योजकांना एक पाठबळ मिळावे या सकारात्मक संकल्पनेतून “महाराष्ट्र व्यापारी पेठ” दरवर्षी भरविण्यात येते. ठाण्यात हे प्रदर्शन ४ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहे.
सर्व ठाणेवासीयांनी तसेच आजूबाजूच्या विभागातील नागरिकांनी महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी या महाराष्ट्र व्यापारपेठेस जरूर भेट द्यावी असे आवाहन बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे करीत आहोत.