दिव्यातील विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी समाजसेविका सौ.आश्विनी केंद्रे यांचा दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांना आंदोलनाचा इशारा

0

दिवा, ता 8 (संतोष पडवळ ) ठाणे मनापाच्या हद्दीतील दिवा शहरात दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नाले सफाई व्यवस्थित झालेली नसल्याचा आरोप करीत सद्या पावसाळा सुरू असल्याने दिवा शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले आहे तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर,नाल्यात जमा होवून रोग राई पसरत आहे.त्यामुळे गणेशोत्सवापुर्वी दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन शहरातील वाँर्ड क्र.27 व 28 येथे औषधी धूर फवारणी करणे, भाडेतत्वावर दवाखान्याची सुविधा निर्माण करुन 8 डाँक्टर,16 नर्स व 2 अँम्बुलन्सची सुविधा करण्यासाठी समाजसेविका सौ.आश्विनी अमोल केंद्रे यांनी पालिकेला निवदेन दिले आहे.
दिवा शहरात जवळपास अंदाचे 7 लाख पेक्षा जास्त नागरिक राहतात.येवढी लोकसंख्या असतानाही दिवा शहरात एकही शासकीय दवाखाना,हॉस्पिटल, उपआरोग्या केंद्र अशी कोणतीही सुविधा उपलब्ध का होत नाही?याचा सामान्य दिवा वासियांना प्रश्न पडलेला आहे.शासकीय नियमानुसार ज्या ठिकाणी 5 हजार लोकसंख्या असते तेथे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी 1 उपकेंद्र दिले जाते.तर 20 हजार लोकसंख्या असलेल्या ठिकाणी प्रथमोपचार केंद्र दिले जाते. दिवा शहरात अशी सुविधा उपलब्ध करून देण्यास पालिका का कचरत आहे.असा प्रश्न पडला आहे.
दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयी गांभीर्याने विचार करून जो पर्यंत शासकीय हॉस्पिटल बंधण्यात येत नाही तोपर्यंत तात्काळ भाडे तत्वावर जागा घेवून मुंब्रा देवी कॉलनी,बीआर नगर, साबे गाव,दिवा गाव,गणेश नगर,बेडेकर नगर, दातीवली,सदाशी दळवी नगर , नारायण भगत नगर,रिलायन्स टॉवर दत्त मंदिर या ठिकाणी प्रथमोपचार आरोग्य केंद्र किंवा उप आरोग्य केंद्र सुरू करावे.तसेच जागा उपलब्ध होई पर्यंत आरोग्य विभाग ठाणे महानगर पालिका यांच्या मार्फत दिवा शहरातील नागरिकांच्या आरोग्य विषयी गांभीर्याने विचार करून किमान 8 डॉक्टर, 16 नर्स , दोन अंबुलन्स सोबत टीम दररोज पाठवून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना मोफत औषध उपचार करावेत.तसेच संपूर्ण दिवा शहरात साथीचे रोग पसरवू नयेत यासाठी औषधी धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सध्या पावसा मुळे मुंब्रा देवी कॉलनी दिवा स्टेशन रस्ता दुरुस्त करणे,श्लोक नगर फेस 2 सदाशिव दळवी नगर जाणारा रस्ता अर्धवट रस्ता बनवणे, एंजल पराडाईज स्कूल नारायण भगत नगर,दत्त मंदिर रिलायंस टॉवर जाणारा रस्ता,वैभव धाबा जीवदानी नगर साबे गाव जाणारा रस्ता,वक्रतुंड नगर,संतोष नगर जाणारा रस्ता, दातिवली गाव रेल्वे स्टेशन माथार्डी गाव,रामनगर कडे जाणारा अरुंद रस्ता,बेडेकर नगर रविना अपार्टमेंट जाणारा रस्ता, ओमकार नगरचा रस्ता, म्हसोबा नगर रस्ता तात्काळ बनवण्यात यावा .
तसेच दिवा शहरातील रस्त्यांवर ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत.ते तत्काळ बनवण्यात यावे. आपण नागरिकांच्या आरोग्याचा ,रस्त्याचा गांभीर्य पूर्वक विचार सहकार्य करून वरील समस्या तात्काळ सोडवाव्यात. अन्यथा आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्त साहेब,दिवा प्रभाग समिती,ठाणे महानगर पालिका प्रशासन यांची असेल.असे निवेदन दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त यांना निवेदनाच्या मार्फत आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!