दिव्यात मा.नगरसेविका दर्शना म्हात्रे यांच्या प्रभागसुधारणा निधीतून स्थानिक प्रभागात मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याहस्ते पथदिव्यांचे उदघाटन
ठाणे, दिवा. ता 10 (संतोष पडवळ) : ठाणे मानपाच्या हद्दीतील दिव्यात मा.नगरसेविका दर्शना म्हात्रे यांच्या प्रभागसुधारणा निधीतून स्थानिक प्रभागात मा.उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याहस्ते पथदिव्यांचे उदघाटन करण्यात आले. दिव्यातील माजी नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांच्या प्रभागसुधारणा निधीतून आज लोटस व्हीला (मातोश्रीनगर) ते मयूरेश्वरनगर पर्यत बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उदघाटन माजी उपमहापौर श्री.रमाकांत मढवी यांच्या शुभहस्ते करण्यात आला प्रसंगी मा नगरसेविका दर्शना म्हात्रे, यांच्यासह सर्व विभाग प्रमुख श्री चरणदास म्हात्रे , विभाग प्रमुख श्री शशिकांत पाटील ,उपविभाग प्रमुख श्री सचिन चौबेजी, श्री.जगदिश भंडारी शाखाप्रमुख श्री.सुरेश पाटील, शिवसेना पदाधिकारी,महिला आघाडी व स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.