दिव्यात स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त 75 कर्तुत्वान महिलांचा सन्मान
ठाणे, दिवा ता 12 ऑगस्ट (संतोष पडवळ) :-भारतीय जनता पार्टी दिवा शहर आणि तन्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवा विभागात ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजनजी डावखरे आणि ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात दिवा विभागात 75 वा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त दिव्यात 75 कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजनजी डावखरे साहेब महिला मोर्चा अध्यक्षा मृणालताई पेंडसे संघटक सरचिटणीस विलास साठे सुजय पत्की हर्षला बुबेरा शिवाजी आव्हाड बिंदू दुबे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार निरंजन डावखरे विलासजी साठे मृणालताई पेंडसे शिवाजी आव्हाड सुजय पत्की यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम दिवा महिला मोर्चा अध्यक्ष व तन्वी फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्योती राजकारण पाटील यांनी आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमासाठी दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, ठाणे शहर ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत, कार्यकारणी सदस्य विजय भोईर, अशोक पाटील, गणेश भगत , मंडल संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर, महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील, उत्तर भारतीय मोर्चा सरचिटणीस अवधराज राजभर ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत, गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा अशोक सोळंकी मधुकर पाटील, प्रवीण पाटील, अंकुश मढवी, वार्ड अध्यक्ष नागेश पवार,राहुल साहू, आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते