तडीपार आरोपीस मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांकडून शिताफीने अटक
मुंबई, ता 13 ऑगस्ट (संतोष पडवळ) : तडीपार असलेल्या आरोपीस मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांकडून शिताफीने अटक करण्यात आली आहे.
⏩पोलिस ठाणे* – चुनाभट्टी पोलीस ठाणे वि .स्था. ख.क्र 148/2022, कलम 142,37(1),135 मपोका
⏩ फिर्यादी चे नाव* – विजय गुलाबराव घाडगे पो. ह. क्र. 30203 रा. ठी. पनवेल
⏩ गुन्हयाचे ठिकाण-* लष्कर मित्र मंडळ ,लाल डोंगर, चेंबुर , मुंबई 70
⏩ गुन्हा घडला दिनांक* 13/08/2022 वेळ 00.15 वा सुमारास
⏩ गुन्हा दाखल दिनांक* 13/08/2022 वेळ 02.53वा
⏩ अटक आरोपीताचे नाव*
१) शार्दुल मधुकर मोरे वय-29 वर्षे रा.ठी. मुकुंदराव आंबेडकर नगर,रुम नं 721, लालडोंगर,चेंबूर, मुंबई-70 यांस दि 13/08/2022रोजी 02.56 वां अटक करण्यात आली आहे.
⏩ हकीकत* :- माननीय पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था बृहन्मुंबई नियंत्रण कक्ष दिनांक 15/08/2022 भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा घातपात अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता दिनांक 10/08/2022 ते 14/08/2022 या कालावधीमध्ये 23.00 ते 02.00 विशेष मोहीम राबवण्याचे आदेश केल्याने दिनांक 13/08/2022 रोजी कोंबिंग अभियान राबवत असताना चुनाभट्टी पोलीस ठाणे हद्दीतील तडीपार गुन्हेगार शार्दुल मधुकर मोरे वय 29 वर्षे रा . ठी .लाल डोंगर सदरचा इसम हा लष्कर मित्र मंडळ लाल डोंगर चेंबूर येथे येण्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच रात्रपाळी पर्यवेक्षक ठुबल साहेब यांचे योग्य ते सूचना घेऊन लष्कर मित्र मंडळ लालडोंगर या ठिकाणी रवाना होवून तडीपार आरोपी शार्दुल मधुकर मोरे यास घेराव घालून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सरडे, हवालदार घाडगे, पोलीस शिपाई काळे, पोलीस शिपाई माने, या नमूद तडीपार आरोपीतास शिताफिने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला चाकू मिळून आला. नमूद तडीपार आरोपीतास पोलीस ठाणे येथे घेवून येवून विशेष स्थानिक खटला क्रमांक 148/22 कलम 142,37(1),135 मपोका प्रमाणे तडीपार आरोपीतावर कारवाई करण्यात आली
⏩ तपास पथकातिल श्री सपोनि सचिन सरडे,
पोहवा विजय घाडगे, पोशि चेतन माने,पोशि सचिन काळे
तसेच सदर श्री अनिल देसाई (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) चुनाभट्टी पोलीस ठाणे,मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी केली.