सोशल मिडीयावरुन बदनामीकारक मजकुर टाकल्याप्रकरणी दिव्यातील भाजपच्या रोहिदास मुंडे यांच्या विरोधात मुंब्रा पोलीसांत तक्रार दाखल.

0

ठाणे, दिवा ता 14 ऑगस्ट (संतोष पडवळ ) भाजप दिवा शहराच्या फेसबुक अकाऊंड वरुन सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांची बदनामी करणारी तसेच जनतेच्या भावना भडकविणारा मजकुर टाकल्याप्रकरणी भाजपाचे दिवा शिळ मंडळ अध्यक्ष विरोधात सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश पाटील आणि सौ.अर्चना पाटील यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री अशोक कडलग यांची भेट घेत लेखी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीनंतर पोलीसांनी कारवाई केल्यास दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष श्री रोहीदास मुंडे हे नाहक अडचणीत सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.या तक्रारीनंतर मात्र सदरची पोस्ट श्री मुंडे यांनी हटविल्याचे दिसून येत आहे.

सोशल मिडीयावर वादग्रस्त पोस्ट

भाजपाच्या अधिकृत सोशल मिडीयावर भाजपाचे मंडळ अध्यक्ष श्री रोहीदास मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचे निदर्शनास येत आहे.या मजकुरात त्यांनी जाणूनबुजून फितुर,देशद्रोही ठरविणे,नतभ्रष्ट्र कपाळ करंटे,मुर्ख माणसा असे विविध शब्दप्रयोग केल्याचा आरोप श्री निलेश पाटील यांनी केला आहे. एका जबाबदार मंडळ अध्यक्ष असलेल्या श्री रोहीदास मुंडे यांनी अश्या पद्धतीत सोशल मिडीयावरुन टाकलेला मजकुर हा बदनामीकारक आणि खोडसाळ वृत्तीचे दर्शन घडविणारा आहे,तसेच सदरची पोस्ट रोहीदास मुंडे यांनी हटविली असून जर बदनाम करणारी नव्हती तर का हटविली ? याची पोलीसांनी चौकशी करावी असे श्री निलेश पाटील यांनी म्हटले आहे.

*काय म्हणाल्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.अर्चना पाटील*
देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जणू आपल्याच पक्षाचा अजेंडा असल्यासारखे दिवा शहरातील काही जणांना वाटत असून मी व माझे पती घरोघरी जाऊन ध्वज वाटप करीत असल्याने काहींच्या डोळ्यात चांगलेच खूपले आहे.आणि त्यामुळेच माझी आणि माझ्या पतीची बदनामी करण्याची संधी शोधली जात असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे.दिवा मंडळ अध्यक्ष रोहीदास मुंडे यांनी भाजप दिवा शहर या भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत अकांऊंटवरुन माझ्या पतीची बदनामीकारक पोस्ट टाकली असून सदर पोस्टमध्ये माझ्या पतीला देशद्रोही ठरवून, त्यांनी तिरंगा रथ तलावात नेवून बुडवा असा उच्चार केल्याचा धादांत खोटा आरोप रोहीदास मुंडे यांनी केला आहे.सदर पोस्टमध्ये माझ्या पतीने तिरंग्याचा खोटा अपमान केला असल्याचे खोटे सांगून लोकांना माझ्या कुटूंबाविषयी भडकविण्याचा प्रयत्न केला आहे.
वास्तविक माझे पती असे काहीही शब्द बोलले नसताना त्यांच्याविषयी आरोप करुन त्यांची आणि माझ्या परिवाराची बदनामी करणारी आणि आमच्याविरुद्ध जनभावना भडकविणारी पोस्ट टाकण्यात आली असल्याचे अर्चना पाटील यांनी तक्रारीत नमुद केले आहे.

मुंब्रा पोलीसांत तक्रार

यासंदर्भात मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कडलग यांच्याकडे भाजप दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहीदास मुंडे यांनीच भाजप दिवा शहर या फेसबुक अकाऊंट वरुन देशाच्या राष्ट्रध्वजाचा व देशभावनेचा वापर बदनामी करण्यासाठी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते श्री निलेश पाटील आणि सौ.अर्चना पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे.दरम्यान श्री रोहीदास मुंडे यांच्यावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा येत्या स्वातंत्रदिनी दिवा शहरात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान मुंब्रा पोलीसांनी गुन्हा दाखल केल्यास श्री रोहीदास मुंडे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.तसेच सदरची पोस्ट परस्पर टाकल्यामुळे व भाजपाच्या शिस्तीत न बसल्यास वरिष्ठांकडूनही विचारणा होऊ शकते.त्यांच्या पदालाही धोका पोहचू शकतो असे वर्तविले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!