“हर_घर_वर्तमानपत्र “अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, ता 15 ऑगस्ट (संतोष पडवळ) : स्वातंत्र्याला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या प्रमाणे बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने “हर घर वर्तमानपत्र” या अभियानाला नागरिकांचा उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
प्रत्येक घरात वर्तमानपत्र असेल तेव्हाच वैचारिक स्वातंत्र्याची सुरुवात होईल हे जाणून मुंबईच्या मा.महापौर किशोरी पेडणेकर व विधानपरिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी या आभिनयानास शुभेच्छा दिल्या. सर्व सुजाण नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र घ्यावे असे आवाहन केले तसेच हर घर वर्तमानपत्र अभियानाचे कौतुक करून वृत्तपत्र विक्रेत्यांना कौतुकाची थाप दिली.