ठाणे महापालिकेच्यावतीने ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत ‘समुह राष्ट्रगीत गायन’ संपन्न

ठाणे (ता १७, संतोष पडवळ ): भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात सर्वत्र ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ व ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले असून आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समुह राष्ट्रगीत गायन’ पार पडले.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शकसुचनेनुसार सकाळी ठीक ११ वाजता समूह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त जी.जी.गोदेपुरे, उप आयुक्त वर्षा दीक्षित यांच्यासह महापालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी, तसेच महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
…………………..
फोटो कॅप्शन : ठाणे महापालिकेच्यावतीने ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘समुह राष्ट्रगीत गायन’ पार पडले.