कल्याण रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर दोनवर अडीच वर्षाच्या चिमुकल्याला पळवल्याची घटना
कल्याण, ता 18 ऑगस्ट (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर दोनवर अडीच वर्षाच्या चिमुकल्याला पळवून नेण्याची घटना घडली असून सदर घटना आज (18 ऑगस्ट) रोजी पहाटे साडेचार वाजता घडली.
प्रसंगी कल्याण लोहमार्ग पोलिसांना सात तासात आरोपी केला गजाआड करण्यात यश आले आहे.सदर आरोपी मध्ये एक पुरुष व महिलांचा समावेश असून आरोपी CCTV मध्ये आढळून आल्याने आरोपीना पकडण्यात यश आले असून पुढील चौकशी कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत