गणेशोत्सवापूर्वी दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीतील रस्त्यावरील खड्डे बुजवा – रोशन भगत, भाजप.
ठाणे, दिवा ता 19 ऑगस्ट (संतोष पडवळ) :-दिव्यातील मुंब्रा देवी कॉलनी फेज वन व अन्य मुख्य रस्त्यांची गणपती उत्सवापूर्वी तातडीने डागडुजी करण्यात यावी व खड्डे बुजविण्यात यावेत अशी मागणी भाजपचे रोशन भगत यांनी दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्या माध्यमातून पालिकेकडे केली आहे.
भाजपचे दिवा ओबीसी वार्ड अध्यक्ष रोशन भगत यांनी भाजप शिष्टमंडळा सोबत या विषयावर सहायक आयुक्तांची नुकतीच भेट घेतली.दिव्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांना भेटून त्यांना या विषयात लक्ष घालण्याचे आवाहन भाजपने केले आहे.यावेळी दिवा मंडळाच्या महिला अध्यक्षा ज्योती पाटील आर पी आय कल्याण विधानसभा अध्यक्ष एकनाथ भगत सरचिटणीस समीर चव्हाण व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर त्रिभुवने ताई उमेश जाधव वार्ड अध्यक्ष नागेश पवार अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दिव्यातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने गणेशोत्सवापूर्वी येथील खड्डे बुजवण्यात यावेत व गणेशोत्सव आनंदात पार पडावा अशी मागणी रोशन भगत यांनी या निवेदनाद्वारे केले आहे.