रोटरी क्लब आँफ दिवा आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात बेरोजगार युवकांना तात्काळ नियुक्तीपत्रे
ठाणे, दिवा ता 21 ऑगस्ट (संतोष पडवळ ) रोटरी क्लब आँफ दिवा, ठाणे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून दिवा विभागातील तरुण-तरुणींना तात्काळ नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे. हा मेळावा दिवा येथील एस.एम.जी हायस्कूल येथे आज सकाळी 12 ते 5 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात 19 ते 32 वयोगटातील युवक व युवतींनी आपला सहभाग दर्शविला होता.मेळाव्या दरम्यान मुलाखतींमध्ये निवड झालेल्या 164 युवकांना तत्काळ नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली आहेत.
कोरोना काळानंतर अनेक युवक नोकरीच्या शोधात आहेत.काहींना नोकऱ्या मिळविण्यात मोठ्याप्रमाणात अडचण होत आहे.तर काहींना नोकरी नेमकी शोधायची कुठे असाही प्रश्न असतो.त्यामुळे अपुऱ्या माहीतींमुळे अनेक युवकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेवून रोटरी क्लब आँफ दिवाचे श्री अभिषेक संतोष ठाकूर, सचिव युवराज धनंजय बेडेकर,कार्यक्रमाचे आयोजक श्री वैष्णव नवनीत पाटील यांनी उत्कृष्टरित्या नियोजन करुन युवकांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.यावेळी प्रतिष्ठीत नागरिक श्री नवनीत पाटील,श्री स्वप्नील गायकर,श्री भुषण म्हात्रे,श्री साईनाथ म्हात्रे,श्री अभिजित अलिमकर,श्री युवराज बेडेकर,आदीत्य पाटील,प्रतिक बेडेकर यांच्याहस अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.