दिवसाढवळ्यात घरात शिरुन 3 मोबाईल फोनसह लिनोव्हा टॅब चोरी करणाऱ्याला अटक
मुंबई, ता 21 ऑगस्ट (किशोर गावडे) दिवसाढवळ्यात घरात शिरुन 3 मोबाईल फोनसह लिनोव्हा टॅब चोरी करणाऱ्या आरोपीस ठाणे शिळफाटा येथून मुद्देमालासह अटक केल्याचे वृत्त हाती आले आहे.
शादाब उमर सिद्दीक,32 हे आरोपीचे नाव असून
खान कंपाऊंड, दोस्ती बिल्डिंगच्या मागे, शिळफाटा ठाणे येथून 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता पोलिसांनी कौशल्याने तपास करून आरोपीच्या मुस्क्या आवळल्या.
भांडूप पोलिसांनी 500/2022 , भांदवि,कलम 380,34 अन्वये गुन्हा दाखल करून चोरीचा माल हस्तगत केला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीत आणखी कोण आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत.
23 जुलै रोजी रात्री 7.45 वाजता फिर्यादी हे बाथरूमला गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने उघड्या दरवाजातून प्रवेश करून बेडरूममधील बेडवर असलेले 3 मोबाईल व लिनोवा टॅब असा 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल व मौल्यवान वस्तू चोरट्याने फिर्यादीच्या घरातून लुटल्या होत्या.काही दिवसांपूर्वीच भांडुप पश्चिम विभागात चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. पोलिसांनी अज्ञात आरोपितांचा शोध सुरू केला होता.या घटनेविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.
आपल्या खबऱ्यांना कामाला लावत पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांना या टोळीच्या मागे लावत पोलिसांनी शादाब उमर सिद्दिक या आरोपींला ठाणे शिळफाटा येथून अटक केली .
आरोपींवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात विविध पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत का?याचीही पोलीस चौकशी करत आहेत.आरोपी शादाब चोरीचा प्लान आखायचा. एखाद्या भागात फिरत असताना तिथल्या लोकांवर नजर ठेवायची, परिसराची रेकी करायची हा त्यांचा हातखंडा होता.एखादं सावज हातात आल्यानंतर ते संधी साधून घरात शिरुन चोरी करायचे. अशा आरोपींला अखेरीस जाळ्यात अडकवण्यात भांडुप पोलिसांना यश आलं आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेखा कपिले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन उन्हवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे ,धनंजय शिंदे ,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल डमरे, सपोउप.निरी. पवार ,पोना लुंबाळ, पौना पाटील, पो.शि. राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.