खेड तालुका कोकण राहिवाशी मंच दिवा शहराच्या 5 व्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व विध्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात.
ठाणे, दिवा ता 22 ऑगस्ट (संतोष पडवळ) दिवा शहरातील प्रत्येक शाळेतून आलेल्या 10 वी आणि 12 वी विध्यार्थ्यांचा विशेष सन्मान करून गौरविण्यात आले. जवळ जवळ 122 विध्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानपत्र,शैक्षणिक साहित्य, व विशेष सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेलेआर. एन. विद्यालयाचे संस्थापक,श्री. साईबाबा चारिटेबल ट्रस्ट चे संस्थापक,समाजसेवक सन्माननीय श्री. नरेश जी पवार साहेब , प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले कोकण युवा मंच आणि कोकण बाजार चे संस्थांपक सन्माननीय श्री. अजय यादवरावं साहेब, त्यांचे पदाधिकारी श्री. विकास निकम साहेब,कोकण प्रतिष्ठान दिवा (रजि.)या संस्थेचे खजिनदार शिवभक्त श्री. रमेश शिंदे साहेब,जल फाउंडेशन कोकण विभाग या संस्थेचे कमिटी सदस्य श्री. सुखदेव गायकवाड साहेब, कुणबी रहिवाशी संघटनना दिवा चे अध्यक्ष श्री शांताराम कांगणे साहेब,माणगावं निजामपूर संघटनेचे अध्यक्ष श्री. डिंगे साहेब,सुलोचना रसाळ म्याडम,आम्ही महाडकर संघटनेचे अध्यक्ष श्री. राहुल गायकर साहेब, जाणता राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. समीर चव्हाण साहेब, राजेंद्र आंब्रे साहेब,श्रीमंतयोगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अरविंद उभारे साहेब, भावे साहेब,रवी शेजवळ साहेब,संकेत चव्हाण साहेब,राहुलजी कानसकर,सम्यक बुद्ध विहाराच्या कार्याध्यक्षा सुवर्णा कांबळे म्याडम,कदम साहेब,जाधव साहेब,जनविकास फाउंडेशन च्या रीना मुन्नी म्याडम, संदीप जी पाटील, दिव्यांग आधार दिवा या संस्थेचे अध्यक्ष श्री धनाजी पोवार साहेब, दिवा पत्रकार संघांचे अध्यक्ष श्री. पडवळ साहेब, सचिव अमित साहेब, आर. एन. विद्यालयाच्या प्रिन्सिपलं म्यॅडम,तसेच दिवा शहरातील वेगवेगळ्या विभागातून आलेले संस्थेचे सदस्य, मान्यवर मंडळी,गावापातळीवरून आलेले आमचे हितचिंतक, अशा सर्वच मान्यवारांनी या वर्धापन दिनाला हजेरी लावून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यक्ष श्री.अजीत कदम यांनी केले संघटनेचे सचिव श्री निलेश पाटणे यांनी संघटनेच्या 5 वर्षातील लेखाजोका मांडून संघटनेच्या पुढील वाटचालीवरती आपले मत मांडले संघटनेचे संपर्क प्रमुख श्री. प्रविण उतेकर साहेब विध्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ विशेष मार्गदर्शन केले संघटनेला सतत आर्थिक मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख अमोल जाधव साहेब व संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सतीश निकम परिवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
अश्याप्रकारे संस्थेचा पाचवा वर्धापन दिन व विध्यार्थी गुणगौरव सोहळ्याला 500 ते 600 (विध्यार्थी, पालक, सभासद, व पाहुणेमंडळी ) जनांची उपस्थिती राहिली होती.
ज्या ज्या सदस्यांनी कार्यक्रमाला सढळ हस्ते आर्थिक,व वास्तूरूपी मदत केली अश्या सर्वच सदस्यांचे संस्थेच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो 🙏अध्यक्ष्याच्या भाषणानंतर सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा
श्री.निलेश शांताराम पाटणे सर्वांचे आभार मानले