दिव्यात भारतीय मराठा संघाच्या वतीने दिवंगत विनायक मेटे यांना सामुहीक श्रद्धांजली.
ठाणे, दिवा ता 26 (संतोष पडवळ) : दिव्यात भारतीय मराठा संघ यांच्या वतीने मराठा समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देणारे शिवसंग्राम पक्षाचे प्रणेते,विधान परिषद माजी आमदार स्वर्गीय विनायक मेटे साहेब यांना सामुहीक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानिमित्ताने भारतीय मराठा संघ संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार यांनी आगामी काळात सर्व मराठा समाज एकत्र घेऊन यापुढेही हा लढा असाच अविरत सुरु ठेऊ असे सुतोवाच केले. तसेच सरकार ने मराठा समाजाचा विचार करून लवकरात लवकर आरक्षण द्यावे हीच खऱ्या अर्थाने स्वर्गीय मेटे साहेबांना श्रद्धांजलि असेल असे सुचविले.याप्रसंगी सर्व भारतीय मराठा संघ पदाधिकारी,दिव्यांग सामाजिक संस्था,लिटल बड स्कुल प्रतिनिधी,कोल्हापूर जिल्हा रहिवाशी सेवा संस्था,रायगड जिल्हा रहिवाशी संघ,रत्नागिरी जिल्हा रहिवाशी संघ यांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.