दिव्यात भाजपचे रोशन भगत व आदर्श महिला मंडळाच्या सौ सपना भगत यांच्या संयुक्त शासकीय लोकउपयोगी योजनांचे शिबीर उत्साहात.
ठाणे, दिवा, ता 27 (संतोष पडवळ) : दिव्यात आदर्श मित्र मंडळ व भाजपच्या संयुक्त विद्यमाने भारतीय डाक विभाग यांच्या सहकार्याने अपघाती विमा योजना , अटल पेन्शन योजना, सुकन्या समृध्दी योजना अश्या भारतीय पोस्टाच्या वेगवेगळ्या लोकउपयोगी योजनांचे दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले होते , या शिबिरात दिवा शहरातील शेकडो जणांनी सहभाग जवळजवळ 350 पेक्षा अधिक नागरिकांनी वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतला प्रसंगी ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री रोशन भगत व आदर्श महिला मंडळ अध्यक्षा सौ सपना भगत आयोजक होते.
सदर कार्यक्रमास ठाणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याचबरोबर ठाणे जिल्हा शहर उपाध्यक्ष नरेश पवार, ठाणे जिल्हा ओबीसी मोर्चा सचिव अशोक पाटील ठाणे कार्यकारणी सदस्य विजय भोईर , गणेश भगत , मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे , संघटक सरचिटणीस दिलीप भोईर , सरचिटणीस श्री समीर चव्हाण , युवराज यादव , महिला अध्यक्षा जोती पाटील , युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर , माजी महिला अध्यक्षा सीमा भगत , मंगला राणे , उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंह, व्यापारी अध्यक्ष जयदीप भोईर , गुजराती सेल अध्यक्ष रमेश वोरा , डॉ आघाडी अध्यक्ष विद्यासागर दुबे , ज्येष्ठ पदाधिकारी सुधीर म्हात्रे,अंकुश मढवी , प्रवीण पाटील , मधुकर पाटील , वार्ड अध्यक्ष श्री प्रकाश पाटील , नागेश पवार , विजय वाघ तसेच जीलाजीत तिवारी , पंकज सिंग , शमशेर यादव , अवधराज राजभर , गौरीशंकर पठवा,श्रीधर पाटील, सुशील सिंह , राहुल साहू , सुदेश पाटील , गणेश सावंत, प्रसाद शेलार , वीरेंद्र गुप्ता अश्या दिवा मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी भेट देऊन योजनेचा ही लाभ घेतला