भाजपचे सचिन भोईर यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहरातील साबे गावातील अनेकांचा भाजपात प्रवेश
ठाणे, दिवा, ता 27 (संतोष पडवळ) भारतीय जनता पार्टी दिवा शहरातील साबे गावातील अनेकांचा भाजपात प्रवेश झाला प्रसंगी ठाणे शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री आमदार निरंजन डावखरे साहेब याच्या अध्यक्ष व नेतृत्वाखाली श्री सचिन भोईर याच्या माध्यमातून आज साबे गावातून श्री गुरु पाटील व त्याचे सहकारी व अनेक महिलानी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेशकेला
कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार, व भाजपा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री निरंजनजी डावखरे साहेब यांच्या नेतृत्त्वाने आणि भाजपा दिवा युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन भोईर यांच्या काम करण्याच्या पद्धतीने प्रेरित होऊन दिवा-साबे, वैभव धाबा परिसरातील शिवसेनेचे गुरुनाथ अर्जुन पाटील, ७० ते ७५ पुरुष व महिला सहकाऱ्यांसोबत, तसेच राधा कृष्ण सोसायटीचे रामदास सुगुर, प्रवीण सोनवणे, याच्या सोबत १५-१६ सहकाऱ्यांनी दि. २७-८-२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता सचिन भोईर यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले
या शुभप्रसंगि ठाणे जिल्हाध्यक्ष तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे दमदार आमदार श्री निरंजनजी डावखरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत , युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांच्या पुढकाराने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी महिला मंडल अध्यक्ष सौ ज्योती पाटील, ओ बी सी मोर्चा उपाध्यक्ष अशोक पाटील, रोशन भगत, उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष अजय सिंह, विजय भोईर, दिलीप भोईर, गणेश भगत, सीमा भगत, अंकुश मढवी, नीलेश भोईर, अशीष पाटिल, राहुल साहू, जयदीप भोईर पंकज सिंह, युवराज यादव , प्रकाश पाटिल,जीलाजीत तिवारी, अवधराज राजभर, विजय वाघ, शैलेश भोईर, अशोक गुप्ता, अमरनाथ गुप्ता, वीरेंद्र गुप्ता, सुशील ठाकूर, ऋषिकेश आलिमकर, आकाश भोईर, विपिन भोईर, प्रणव भोईर, साईनाथ भोईर,व इतर पदाधिकारी उपस्थित होते…