चला खेळूया मंगळागौर ; मुलुंड मध्ये पारंपारिक खेळ, गाण्यांसह महिलांचा उत्साह शिगेला.
मुंबई, मुलुंड ता.27 (किशोर गावडे ): पारंपरिक सण उत्सवाची परंपरा जपली जावी. नव्यापिढीला त्याचे आदान प्रदान व्हावे, खेळ व गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, महिलाच्या कलागुणांना वाव मिळावा. या प्रमुख उद्देशाने
*”मंगळागौर कार्यक्रम”* व *”रणरागिणींचा सत्कार”*
समारंभाचे आयोजन
शिवसेना शाखा क्रमांक १०८ आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ मुलुंड यांच्या माध्यमातून ,माजी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य व शाखा क्रमांक 108 चे शाखासमन्वय अभिजीत चव्हाण यांनी २६ ऑगस्ट २०२२रोजी, राजे संभाजी सांस्कृतिक भवन वीर सावरकर मार्ग मुलुंड पूर्व येथे स्वागताध्यक्षा राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सायली सावंत या कार्यक्रमाच्या निमंत्रक होत्या. तर
प्रमुख उपस्थिती म्हणून सौ.ज्योती ठाकरे – महिला आर्थिक विकास महामंडळ – महाराष्ट्र राज्य – राज्यमंत्री दर्जा. माजी नगरसेविका दीपमाला बढे ,मनिषा तुपे -जिल्हा नियाजन समिती सदस्या आदी उपस्थित होत्या.
डॉक्टर सौ शुभा इतोलीकर, केईएम रुग्णालय ,समृद्धी पाटील राणी लक्ष्मीबाई पुरस्कार सन्मानित, भारतीय खेळातील सर्वोच्च पुरस्कार विजेत्या ,श्रीमती राही रेगे सिने कलाकार ,सौ कल्याणी परब श्री स्वामी समर्थ केंद्र मुलुंड पूर्व, नंदिनी सावंत, उपविभाग प्रमुख प्रमिला घाणेकर शाखाप्रमुख.सौ राजश्री मोरे योगशिक्षिका ,शितल पालांडे डॉक्टर अस्मिता सरमळकर यांचा सन्मान स्वागताध्यक्षा कुमारी राजोल संजय पाटील व सौ सायली सावंत यांनी केला. रणरागिणींचा सन्मान करताना महिलांना सन्मानचिन्ह , शाल व तुळशीचे रोप देण्यात आले.
प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाण्यांनी हा खेळ रंगत गेला. तिनशे हून अधिक महिलांचा सहभाग होता.
वेशभूषा मराठमोळी व सर्वानाच भावणारी होती. नऊवारी साडी नेसून, नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून पारंपारिक वेशात नटूनथटून सहभागी झाल्या होत्या.
सौ .ज्योती ठाकरे यांच्या धगधगत्या भाषणाने महिलांमध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण झाली, असे कार्यक्रमाच्या समारोपाला अभिजीत कमलाकर चव्हाण यांनी सांगितले.
महिलांनी केलेल्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी देखील भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाची उत्साहात सांगता झाली.