दिव्यात खा. श्रीकांत शिंदे यांनी कोकणवाशियांसाठी ८२ एसटी गाड्या भगवा झेंडा फडकावून केल्या रवाना

0

ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी यांच्या हस्ते नारळ फोडून पहिली दिवा-चिपळुण धावली.

ठाणे, दिवा ता 29 (संतोष पडवळ ) खासदार डाँ.श्रीकांत एकनाथ शिंदे आणि शिवसेना कल्याण लोकसभा यांच्यातर्फे गणेशोत्सवानिमीत्त सिंधुदूर्ग,रत्नागिरी,रायगड,सांगली,सातारा आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या जाकरमान्यांसाठी मोफत ८२ एसटी गाड्या सोडण्यात आल्या असून काल सायंकाळी डाँ.श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा फडकावित रवाना केल्या.गेल्या वर्षी २२ गाड्या सोडल्या होत्या.यावर्षी ८२ गाड्या सोडल्याने सर्वाधिक गणेशभक्तांनी या एसटी सुविधेचा लाभ घेतला आहे.यावेळी फटाक्यांची आतषबाजी झाली.खासदार श्री श्रीकांत शिंदे यांनी एसटी चालकांना प्रवाश्यांना सुरक्षित नेण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कोरोनासारख्या महामारीनंतर गेली दोन वर्षांनी कोकणातील बांधव बंधनमुक्त होत आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे.कोकणात जात असताना प्रवासाचा सुखद प्रवासाचा प्रश्न आहे.या काळात ट्रेन हाउसफुल्ल होत असल्याने तासनसात उभ्याने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसे.मुलाबाळांसह प्रवास करण्यासाठी जिकरीचे प्रयत्न करावे लागतात.कोकणातील बांधवांच्या या समस्या लक्षात घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डाँ.खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे व शिवसेना दिवा शहर विभाग यांच्या नियोजनामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ८२ एसटी महामंडळाच्या बसेस सोडण्यात आल्या आहेत.एकूण चार हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी या एसटी सेवेचा लाभ घेतला आहे.
यावेळी खासदार श्री श्रीकांत शिंदे,जिल्हाध्यक्ष श्री गोपाळ लांडगे,श्री दिपक म्हात्रे, ठाण्याचे माजी उपमहापौर श्री रमाकांत मढवी,मा.नगरसेवक श्री शैलेश पाटील,दिवा उपशहरप्रमुख श्री.गणेश मुंढे,सौ.सुनिता मुंढे,शहर संघटक श्री.अँड.आदेश भगत,मा.नगरसेवक श्री अमर ब्रम्हाशेठ पाटील,मा.नगरसेवक श्री.दिपक जाधव,मा.नगरसेविका सौ.दिपाली भगत,श्री उमेश भगत,मा.नगरसेविका सौ.दर्शना म्हात्रे,श्री चरणदास म्हात्रे,श्री गुरु पाटील,युवतीप्रमुख कु.साक्षी मढवी,श्री निलेश पाटील,सौ.अर्चना पाटील,श्री भालचंद्र भगत आदींसह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!