दिवा-आगासन रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – दिवा भाजपचे मुंब्रा पोलिसांना निवेदन.

0

ठाणे, दिवा ता 29 (संतोष पडवळ) :- दिव्यातील निकृष्ट रस्त्यांची कामे व खड्ड्यामुळे अपघात होऊन एका तरुणाचा जीव गेल्याने दिवा आगासन रस्त्याचा ठेकेदार व पालिका अभियंत्यावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार दिवा भाजपने मुंब्रा पोलिसांची भेट घेऊन केली आहे.

पोलिसांना दिलेल्या पत्रात भाजपने म्हटले आहे की,या रस्त्याचे मागील पाच वर्षापासून काम सुरू आहे. अतिशय संथगतीने या रस्त्याचे काम सुरू असून ते नियमित होते की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे.अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने काम या ठिकाणी झाल्याच्या तक्रारी देखील वारंवार अनेक नागरिकांनी केल्या आहेत. त्याचबरोबर गणेश नगर, बेडेकर नगर, आगासन पट्ट्यामध्ये या रस्त्याचं निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून काम रखडलेले आहे. निकृष्ट दर्जाचे काम व अर्धवट कामाचा फटका एका तरुणाला बसला असून निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे गणेश उत्सवाच्या तोंडावर या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.खड्ड्यामुळे सदर तरुणाचा हकनाक जीव गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारावर, संबंधित अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दिवा भाजपने केली आहे,यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विनोद भगत ठाणे कार्यकारणी सदस्य विजय भोईर दिवा शहर मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील मधुकर पाटील प्रवीण पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!