जन विकास फाऊंडेशन (म.राज्य) दिवा कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
ठाणे,दिवा ता 30 (संतोष पडवळ) जनविकास फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या दिवा कार्यकारिणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा पब्लिक स्कूल,गणेश विद्यामंदीर जवळ,गणेश पाडा दिवा पुर्व येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या सर्व नवनियुक्त कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री जयसिंग विठ्ठल कांबळे यांनी अभिनंदन केले असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र मराठी सामाजिक संघाचे अध्यक्ष श्री दिपक काळींगण,सामाजिक प्रतिष्ठान कळवाचे पदाधिकारी श्री संतोष पालांडे,समाजसेवक श्री निलांचल पात्रा,ज्येष्ठ शिवसैनिक श्री प्रविण उत्तेकर,श्री निलेश पाटणे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
जनविकास फाऊंडेशन सामाजिक संस्था २०१७ पासून दिव्यातील सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहे.या संघटनेते राज्यभरातून अनेक सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत.संस्थेचे कार्य अधिक तीव्रतेने वाढावे आणि सर्वसामान्य नागरीकांना न्यायदान प्रदान करता यावे यासाठी आज दिव्यातील वाढते शहरीकरण लक्षात घेता संस्थेने विविध पदांवर नवनियुक्त्या करुन जबाबदाराऱ्या सोपविल्या आहेत.कार्याकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष श्री दिपक उत्तेकर, कार्याध्यक्ष- अशोक आमोडकर,उपकार्याध्यक्ष गोविंद घाडीगांवकर,उपकार्याध्यक्ष सुधिर घोलप,उपाध्यक्ष मारुती मोरे,उपाध्यक्ष अजित माने,उपाध्यक्ष निवास शिंदे,उपाध्यक्ष विजय वाघ,सरचिटणीस अनिल नलावडे,चिटणीस संतोष मांढेरकर,चिटणीस विनोद तळेकर,उपसरचिटणीस संतोष फाटक,खजिनदार संपद गुंजाळ,सहखजिनदार एकनाथ पाटील,हिशोब तपासणीस हनुमंत कुंभार,कृष्णा पांडे हिशोब तपासणीस दिलीप खामकर,प्रवक्ता प्रविण उत्तेकर,प्रसिद्ध प्रमुख डि.के.खरात,संपर्क प्रमुख निलेश पाटणे,प्रमुख संघटक संदिप पाटील,तानाजी पवार,प्रमुख सल्लागार अशोक पाटील,नागेश पवार,संपर्क प्रमुख नंदकुमार ढुलगुडे,संपर्क प्रमुख नरेश कदम,संपर्क प्रमुख गजानन भांगणे,
महिला अध्यक्ष रिना मोनी,कार्याध्यक्षा सुशिला रसाळ,उपाकार्याध्यक्षा रेवती राणे,उपाध्यक्षा सुनिता पांचाळ,सचिव प्रिती राठोड,उपसचिव अमृता पांचाळ,खजिनदार उषा मुंडे,उपखजिनदार मंगल पाटील,हिशोब तपासणीस सविता बेहरा,उपतपासणीस मंजुदेवी निशाद आदींना नियुक्तीपत्रे देवून सन्मानित करण्यात आले आहे.
युवा आघाडी – कार्याध्यक्ष रमेश शिंदे,उपकार्याध्यक्ष निशांत यादव,रविंद्र जाधव,उपखजिनदार संतोष पवार, अध्यक्ष कपिल रोडे,उपाध्यक्ष रुपेश कडगांवकर,उपाध्यक्ष आदर्श आव्हाड,उपाध्यक्ष उमेश शिंदे,सचिव अनिकेत वीरकर,उपसचिव अजित पाटील,उपसचिव नमन झा,खजिन दार बसुराज ओणगे,उपखजिनदार सुनिल भोईर,संपर्कप्रमुख रामदास म्हसकर,संपर्कप्रमुख संजय थोरे