दिवा शहरात पोलीस संचलन.
ठाणे, दिवा ता 5 सप्टेंबर (संतोष पडवळ) : गेली दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर या वर्षी सण-उत्सव मोठ्या प्रमाणात उत्सlहात साजरे होत आहे. त्या अनुषंगाने गणेशउत्सवात दिवा शहरातील कायदा सुव्यवस्था अभादित रहावी यासाठी दिव्यात पोलीस संचालन करण्यात आले. प्रसंगी दिवा पोलीस चौकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शहाजी शेळके यांच्या सह सर्व पोलीस कर्मचारी व दंगल नियंत्रक पथकाची ऐक तुकडी संचलनात सहभागी झाली होती सदर संचालन दिवा पोलीस चौकी, दिवा-आगासन रोड, गणेश विसर्जन घाट, गणेश नगर, बेडेकर पर्यंत करण्यात आले.यावेळी नागरिकांनी गणेशउत्सव दरम्यान कायद्याचे पालन करून गणेशउत्सव साजरा करावा असे पोलिसांनी अहवान केले.