पुणे जिल्हा परिषदेचा “अध्यक्ष चषक” प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वडगाव आनंद येथील शाळेस प्रदान
आळेफाटा, जुन्नर (पुणे) ता 8 (संतोष पडवळ) : शिक्षक दिनाचे औचित्य साधत 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी जिल्हा परिषद, पुणे अध्यक्ष चषक पुरस्काराचे जिल्हा परिषद पुणे तर्फे अल्पबचत भवन येथे दि 7 सप्टेंबर बुधवार रोजी वितरण करण्यात आले . हे वाटप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य मा.ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री..आयुष प्रसाद (भा.प्र.से), माजी आमदार बाळा भेगडे, भाजपा नेत्या आशाताई बुचके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपदादा कंद, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड, के.डी.भुजबळ, शिक्षण विस्तार अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये शालेय उत्कृष्ट कामगिरी व व्यवस्थापन तसेच गुणवत्तेमध्ये सन्मानाचा समजला जाणारा जिल्हा अध्यक्ष चषक पुरस्कार 2021-22 हा वडगाव आनंद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस प्राप्त झाला. यावेळी शालेय कमिटी शिक्षणतज्ञ सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते डी बी वाळुंज, मुख्याध्यापक सुनील ठिकेकर, शिक्षिका वृषाली कालेकर , मनिषा इले, संगीता कुदळे-ताजणे, गौरी डुंबरे, शालेय व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अविनाश चौगुले, उपाध्यक्ष संदेश काशिकेदार, सदस्या वैशाली देवकर, सुवर्णा नरवडे, दीपाली गडगे, जयश्री देवकर, सचिन देवकर, सतीश भिंगारदिवे, माजी अध्यक्ष योगेश गडगे, माजी सरपंच वैशाली देवकर, शशिकांत देवकर उपस्थित होते.यापूर्वीच्या कालावधीत शाळेच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी पटकविलेला व सन्मानाचा समजला जाणारा जिल्हा अध्यक्ष चषक प्रथम क्रमांक पटकविल्यामुळे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या विशेष पुरस्काराचे जसे शाळेतील सर्व शिक्षक व शालेय व्यवस्थापन कमिटी मानकरी आहेत, त्यात सिंहाचा वाटा खरे अर्थाने एम्पथी फाऊंडेशन, मुंबई, मे.फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे सी.एस.आर. पार्टनर मे.मुकुल माधव फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.रितुजी छाबरिया, विविध ठिकाणचे रोटरी क्लब, ग्रामपंचायत वडगाव आनंद, आळेफाटा व्यापारी असोसिएशन, तसेच या सर्वांना एकत्रित करण्याचे व शासकीय अधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळविण्याचे काम करणारे शाळेचे सर्वेसर्वा डि.बी.वाळूंज व त्यांना सहकार्य करणा-या सर्व मित्रपरिवारास व दात्यांना जात आहे.