सौ.सुरेखा पडवळ यांस पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान.
पुणे, मावळ ता 8 (संतोष पडवळ) जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावाचे श्री रामदास पडवळ (गुरुजी) यांच्या सुनबाई सौ सुरेखा गणेश पडवळ केंद्र शाळा इंदोरी अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वराळे तालुका मावळ जिल्हा पुणे यांना पुणे जिल्हा परिषद पुणे यांचे तर्फे दिला जाणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सन 2021-22 महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते दिनांक सात सप्टेंबर 2022 रोजी अल्पबचत भवन पुणे येथे प्रदान करण्यात आला. प्रसंगी इतर शिक्षकवृंद व पडवळ कुटूंबातील अनेकजण उपस्थित होते.