भांडुपच्या उत्कर्ष क्रीडा मंडळाचा उत्कृष्ट कबड्डीपटटू पुरुषोत्तम प्रभू यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या “फिजिकल ट्रेनर” पदी नियुक्ती
मुंबई,15, किशोर गावडे : अहमदाबाद येथे 26 सप्टेंबर ते 1ऑक्टोंबर 2022 या कालावधीत संपन्न होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी
महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे “फिजिकल ट्रेनर” म्हणून राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
गेली 20 वर्षाहून अधिक काळ भांडुप च्या उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या संघातून कबड्डीचा सराव करीत असताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या पुरुष गटाच्या प्राथमिक संघातून निवड झाल्यानंतर राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांनी आव्हानात्मक परिस्थितीत कबड्डीला सामोरे गेले. मुंबई उपनगरातून महाराष्ट्राच्या संघाला चांगले अष्टपैलू गुणवंत खेळाडू मिळाले पाहिजेत यासाठी पुरुषोत्तम प्रभू यांनी सातत्याने प्रयत्न केले.
कबड्डी खेळावर असलेली निष्ठा पाहून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने
21जुलै 2022 ते 24 जूलै 2022 या कालावधीत 69 पुरुष गट राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा चरखी दादरी हरियाणा येथील झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष गटाचे संघाचे “फिजिकल ट्रेनर”पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली. ती कामगिरी त्यांनी यशस्वी केली.
त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघ व गुजरात ऑलिंपिक असोसिएशनच्या वतीने आणि गुजरात राज्य शासनाच्या सहकार्याने देशाची प्रतिष्ठित 36 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
अहमदाबाद येथे 26 सप्टेंबर ते 1ऑक्टोंबर 2022 या कालावधीत “इका इरीना ट्रान्स स्टेडियम” येथे होणार आहे.
त्या स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या पुरुष संघाचे “फिजिकल ट्रेनर” म्हणून राष्ट्रीय खेळाडू पुरुषोत्तम प्रभू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकारणी सदस्य, राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह अँड. आस्वाद पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभू हे कार्यरत आहेत.