दिव्यात भाजप ठाणे उपजिल्हाअध्यक्ष श्री नरेश पवार आयोजित शेकडो उत्तर भारतीय महिलांचा जीतिया व्रत उत्साहात संपन्न
ठाणे, दिवा (ता 18, संतोष पडवळ ) भारतीय जनता पार्टी दिवा शहर आयोजित ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार आणि सौ.रेश्मा पवार यांच्या पुढाकारामुळे उत्तरभारतीय महीलांसाठी जितीया व्रत उत्साहात संपन्न झाला.आज कोरोनापासून उसंती मिळाल्यानंतर दोन वर्षांनी दिवा शहरातील गणेश तलाव येथे महीलांनी मोठी गर्दी केली असून आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी,चांगल्या संतती प्राप्तीसाठी व गर्भधारणा सुरक्षित राहण्यासाठी,मुलांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी जिमूतवाहन मुर्तीची पूजा केली.महिलांनी पूजेमध्ये धूप,दिवा अक्षता,फुले हार अर्पण करुन प्रार्थना केली.
आज 18 सप्टेंबर रोजी दिव्यातील उत्तरभारतीय महिला जीवितपुत्रिका व्रत ( निर्जला व्रत) पाळत आहेत. महाभारताच्या युद्धात द्रोणाचार्य मारले गेल्यावर त्यांचा मुलगा अश्वत्थामा क्रोधित झाला आणि त्याने ब्रह्मास्त्र सुरू केले, त्यामुळे अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या पोटी जन्मलेले मूल नष्ट झाले. मग भगवान श्रीकृष्णाने त्याचे पुनरुज्जीवन केले. या कारणास्तव याला जीवितपुत्रिका असे नाव पडले. तेव्हापासून माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळू लागल्या.या व्रतानिमीत्त भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार आणि सौ.रेश्माताई पवार यांनी उत्तरभारतीयांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाला हजारौ महिलांनी सहभाग घेतला.व्रत करणाऱ्या अनेक महिलांचे स्वागत व पुष्पगुच्छ,शाल श्रीफल देवून स्वागत केले.
यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार,सौ.रेश्मा पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांची माहीती पत्रक पाटली. तसेच श्री मोदींच्या योजना कश्या वाटल्या याबद्दल नागरिकांनी प्रतिक्रीया देण्यासाठी पोस्ट कार्डही वाटली.
प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष श्री शैलेश मिश्रा,उपाध्यक्ष श्री श्री अमरनाथ गुप्ता,उपाध्यक्ष श्री जिलाजीत तिवारी,उपाध्यक्ष श्री समशेर यादव,उत्तर भारतीय मोर्चा दिवाचे श्री अजय सिंग, दिवा मोर्चा महिला अध्यक्षा सौ.ज्योती पाटील, सचिन भोईर , विजय भोईर,शिला गुप्ता ठाणा मोर्चा अध्यक्ष, पंकज सिंग,चंदन मिश्रा, नागेश पवार, विरेंद्र गुप्ता, युवराज,धवदराज,समिर चौव्हाण,विलास भोईर, सुमित मिश्रा,रोशन भगत, रश्मी सोहनी, रिना यादव, अशोक सोलंकी, समशेर यादव, अजय सिंग, गौरी शंकर पटवा, वर्षा पाटील, यज्ञेश पवार, प्रीती पाटील व इतर विविध मान्यवर उपस्थित होते.