आगासन (दिवा) येथील स्व.शेवंताबाई मुंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन !

0

ठाणे, दिवा ता 20 (संतोष पडवळ]: आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहाचे संचालक ज्ञानेश्वर मुंडे तसेच नरेश मुंडे यांच्या मातोश्री कै .सौ शेंवताबाई बाबू मुंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने विविध सामाजिक, लोकोपयोगी, समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवा -आगासन गावातील सामाजिक कार्यकर्ते बाबू मुंडे यांच्या पत्नी तसेच कल्याण डोंबिवली परिसरातील नामांकित पत्रकार तसेच आपला शहरनामा व आपले शहर वृत्तसमुहाचे संचालक ज्ञानेश्वर मुंडे,नरेश मुंडे, सुनील मुंडे यांच्या मातोश्री कै सौ शेवंताबाई मुंडे यांचे प्रथम पुण्यस्मरण सोमवारी दिनांक १९सप्टेंबर रोजी विविध सामाजिक व आध्यत्मिक कार्यक्रमांनी सम्पन्न झाले या निमित्ताने प्रसिद्ध किर्तनकार ह. भ.प,जयेश महाराज भाग्यवंत (आंबेगाव) यांचे सुश्राव्य कीर्तन झाले तसेच दिवसभर विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले .

गेल्या वर्षी कै सौ शेवंताबाई बाबू मुंडे यांचे अचानक निधन झालं होतं. त्यामुळे मुंडे कुंटूबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. सर्व कुंटूबावर अपार माया व प्रेम करणाऱ्या आईचे असे निघून जाण्याने मुंडे कुंटूबावर शोककळा पसरली होती. त्यामुळे त्यांची सदैव आठवण राहावी म्हणून त्यांचे पुत्र ज्ञानेश्वर ,नरेश, सुनील मुंडे व पती बाबू मुंडे यांनी वर्षभर विविध समाज उपयोगी,लोकोपयोगी, जनहितार्थ कामे केली, गोरगरीब, आदिवासी, कष्टकरी, मजूर, अनाथ यांना अन्नदान, कपडे वाटप,५००बँल्केट, २००बेडशीट, ५०बेंच, आदी साहित्यसह अनाथ कुटुंबाला आर्थिक मदत गरीब विद्यार्थ्यांना शालेयपयोगी वस्तूंचे वाटप केले.

याशिवाय विविध प्रकारच्या स्पर्धांसाठी ९०ट्राप्या, ५ सायकली, घड्याळ, टि शर्ट, इत्यादी वस्तू देखील वाटत करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आंतरराष्ट्रीय सायकलपटू विनोद पुनामिया, तसेच प्रसिद्ध गायक संतोष चौधरी(दादूस)आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सामाजिक आध्यत्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!