दिवा जंक्शन ते सि एस एम टी लोकल सुरु करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ठाणे, दिवा, ता 21 (संतोष पडवळ) दिवा जंक्शन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल लोकल तात्काळ चालू करावी यासाठी समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांच्याकडे मागणी केली आहे. ठाणे स्थानकाच्या नंतर दिवा स्टेशन हे सर्वात गर्दीचे स्थानक आहे.दररोज अंदाजे 2/3 लाख पेक्षा जास्त नागरिक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनास देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो.गेल्या अनेक वर्षांपासून दिवा येथून लोकल चालू करण्याची मागणी होत आहे.काही वर्षा अगोदर 5व्या आणि 6व्या मर्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर लोकल चालू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याचा विसर पडल्याचे दिसत आहे. फक्त निवडणुकीच्या तोंडावर घोषणा नकोत त्या पूर्ण कराव्यात असा खोचक प्रश्न देखील मांडला आहे.सद्या पावसाळा असल्याने पवसालामुळे ट्रेन वेळेवर येत नाहीत. सकाळच्या वेळी होणारी गर्दी खूप मोठी असते.त्यामुळे रेल्वे मध्ये चढणे शक्य होत नाही.परिणामी नागरीकांच्या मनात रोष निर्माण होत आहे.असाच रोष 2015 मध्ये निर्माण झाला आणि त्यातून हिंसक आंदोलन निर्माण झाले होते. त्यानंतर दिवा शहरात फास्ट लोकल थांबवण्यासाठी सुरुवात झाली*.
रेल्वे प्रशासनाच्या दिवा शहरातील नागरिकांच्या वर्षानुवर्षाच्या …..
1) दिवा स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल तत्काळ सुरू करावी.
2)दिवा स्टेशन परिसरात प्रसाधन ग्रहाची संख्या वाढवावी.
3)दिवा स्थानकात आरक्षण खिडकी चालू करावी.
*या मागण्यांची आपण आपल्या मार्फत तात्काळ दखल घेवून त्या पूर्ण कराव्यात.अशी विनंती दिवा शहरातील नागरिकांच्या वतीने समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी मुख्यमंत्री साहेबांच्या कडे केली आहे.