अडीच लाख विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला ठाणेकरांचा स्वच्छ अमृत महोत्सव
ठाणे ता २३ (संतोष पडवळ) : स्वच्छ अमृतमहोत्सव कार्यक्रमातंर्गत ठाणे शहरातील ठाणे महापालिका शाळा व खाजगी शाळांमध्ये स्वच्छता व टाकावुतून टिकाऊ कलाकृती या विषयावर स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धत सर्व शाळांमधील अडीच लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आज दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा व माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पार पडला. तसेच ‘इंडियन स्वच्छता लीग’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर आयोजित केलेल्या ‘ठाणे स्वच्छता लीग’ ध्वज ठाणे महापालिकेतील सर्व प्रभाग समित्यांच्या सहाय्यक आयुक्तांना देण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, योगेश जानकर, उपायुक्त मनीष जोशी, अनघा कदम, प्र. उपायुक्त क्रीडा मीनल पालांडे, प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान तसेच सर्व प्रभागमितीचे सहाय्यक आयुक्त, ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, ठामपा शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार इंडियन स्वच्छता लीग कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छ अमृत महोत्सव ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. विद्यार्थ्यांनी स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे या विषयावर कल्पकतेने रेखाटलेल्या चित्रांचे मान्यवर परीक्षकांच्या माध्यमातून परीक्षण करून विजेते जाहिर करण्यात आले. तसेच टाकाऊ वस्तू वापरून टिकाऊ प्रकल्प तयार करण्याच्या स्पर्धेतही विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.
या निमित्ताने घेण्यात आलेल्या *चित्रकला स्पर्धेतील *ठामपा* शाळांतील प्रथम क्रमांकांचे विजेते : इयत्ता 6 वी – दिशा वाकोडे : ठामपा शाळा क्र. 44, इयत्ता 7 वी : खान रबीया, ठामपा शाळा क्र. 74, इयत्ता 8 वी तनीषा सुतार, ठामपा शाळा क्र. 52 , इयत्ता 9 वी : अन्सारी फातिमा महमंद साजीद ठामपा शाळा क्र. 13
*चित्रकला स्पर्धेतील *खाजगी* शाळेतील प्रथम क्रमांकांचे विजेते : इयत्ता 6 वी – पिंजरी मरीयम एजंल पॅरेडाईज स्कूल, इयत्ता 7 वी चेतना चव्हाण- यशोधन मराठी विद्यालय, इयत्ता 8 वी साहिल साबळे – श्री मॉ बालनिकेतन , इयत्ता 9 वी श्रेया कांबळे : सेंट जॉन बाप्टीस्ट स्कूल
*टाकाऊतून टिकावू* प्रकल्पासाठी विजेत्या ठरलेल्या *खाजगी* शाळा : इयत्ता 6 वी : गौतम विद्यामदिर, इयत्ता 7 वी एस.एम.जी विद्यामंदिर, इयत्ता 8 वी यू.एन.एस इंग्लीश स्कूल, इयत्ता 9 वी : एस.एम.जी विद्यालय.
*टाकाऊतून टिकावू* प्रकल्पासाठी प्रथम क्रमांकांचे *ठामपा* शाळेतील विद्यार्थी : इयत्ता 6 वी – ठामपा शाळा क्र. 65, इयत्ता 7 वी- ठामपा शाळा क्र. 44, इयत्ता 8 वी शाळा क्र. 44, इयत्ता 9 वी ठामपा शाळा क्र. 8
*ठाणे स्वच्छता लीग*
‘इंडियन स्वच्छता लीग’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेने प्रभाग समिती स्तरावर ‘ठाणे स्वच्छता लीग’चे आयोजन केले आहे. यात नऊ प्रभाग समित्यांचे नऊ संघ सहभागी झाले होते. या संघांना नौपाडा नायक, मानपाडा मावळे, उथळसर योद्धा, लोकमान्य लिजंड्स, दिवा डेअरडेव्हिल्स, मुंब्रा मस्केटिअर्स, कळवा नाईट्स, वागळे वॉरिअर्स, वर्तक वीर अशी नावे देण्यात आली असून सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या हस्ते स्वच्छतेचा ध्वज देण्यात आला.