दिवा रेल्वे स्थानकातील अपुऱ्या सुविधांमुळे राष्ट्रवादीचे दिवा रेल्वे स्थानक प्रबंधकांना निवेदन
ठाणे, दिवा ता 24 (संतोष पडवळ) :- दिवा शहराची लोकसंख्या वाढली तरीही येथील स्थानकांतील सुविधांना प्राधान्यक्रम दिले जात नसल्याने आज राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री हिरा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर महिलाध्यक्षा सौ.ज्योती पाटील यांच्या पुढाकाराने रेल्वे प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादीच्या महिलांना दिवा स्थानकातील असुविधांचा पाढा वाचून दाखविला.
दिवा शहराची लोकसंख्या वाढू लागली आहे.अश्यावेळी या दिवा स्थानकांत प्रवाशांच्या सुविधांना रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले पाहीजे होते.मात्र या स्थानकात दिवा जंक्शन ते छत्रपती शिवाजी टर्मिनल येथपर्यंच लोकल सुरु करण्यात आलेली नाही.यामुळे सकाळच्या दरम्यान प्रवास करणाऱ्यांना गर्दीमुळे गाडीत चढायलाही मिळत नाही.तसेच दिवा जंक्शनच्या प्लॅटफार्मवर सरकते जीणे बसविण्यात आलेले नाहीत.तर काही जिन्यांची रुदी कमी असल्याने गर्दीच्या वेळी चेंगराचेंगरी करण्याची भिती आहे.दिव्यांग प्रवाश्यांना प्लॅट फार्मवर लिफ्टची व्यवस्था करणे,प्रत्येक प्लँटफार्मवर शौचालयाची व्यवस्था करणे,लोकलच्या फेऱ्या वाढविणे,कल्याण डोंबिवली वरुन येणाऱ्या जलद लोकल गाड्या दिवा स्थानकात थांबविणे, पुर्वेला रेल्वे तिकीट घर सुरु करणे, रेल्वे ओव्हरब्रीजचे काम लवकरात लवकर सुरु करणे आदी विविध मागण्यांचे निवेदन आज दिवा रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री हीरा पाटील, माजी नगरसेविका सौ.सुलोचना पाटील, दिवा शहर महिला अध्यक्षा सौ.ज्योती निलेश पाटील, समाज विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.नंदकिशोर देसाई, समाजसेवक अमित सावंत, कल्याण ग्रामीण युवा अध्यक्ष श्री केतन जगताप, समाजसेवक श्री बाळु थोरात,श्री निलेश पाटील,श्री दिपक पाटील, सौ.पूनम जैस्वाल, ममता नारदे, शेजलताई, यास्मिन कुरेशी
शांताराम पाटील,गणेश मात्रे,कुणाल काळे,चेतन दातीलकर, श्याम तावरे, निशा पराड,दुर्वेश आलीमकर, यास्मिन कुरेशी, निशा पराड, सौ.माधवी नंदकिशोर देसाई आदी राष्ट्रवादीचे विविध कार्यकर्ते उपस्थित होते.